White माहित नाही मज.. शब्दवेडा किशोर माहित नाही मजला काहीच की काय माझं उद्याचं स्वरूप असेल जिवंत ठेवणारी सारी सुखं लाभतील मला की माझ्या गळा तो चंदनटिळ्याचा मोतिहार असेल ||१|| शापित या जोकराला नव्या जन्मात तरी सुख मिळेल की आहे जुना वारसा त्याच्या ललाटी लिहिलेला त्याच जुन्या वाटेचा मी नव्याने वारकरी झालेला असेल ||२|| ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर