Nojoto: Largest Storytelling Platform

#आयुष्याची सप्तपदीमय तप्तपदी प्रिय सखी संवादीनी..म

#आयुष्याची सप्तपदीमय तप्तपदी
प्रिय सखी संवादीनी..मज आवडतं....अचानक आयुष्याच्या काही खास वळणावर तुझ्या-नि-माझ्या नजरेचं
ते जुळणं अन् त्यातच होतं आपसुकच आभाळातील सप्तरंगाचं एकमेकात मिसळणं
अचानक मग पावसाच्या सरींचं अनाहतपणे येणं अन् काही थेंब तुझ्या
गुलाबी गाल अन् ओठांवर अलगदपणे विसावणं मग क्षणभर माझं तुजकडे पाहात राहाणं अन् नव्यानं आयुष्यात मजला पुन्हा पावसाचा थेंब व्हावसं वाटणं........
अजुनही आठवे मज अन् तुजसोबतीची ती एकमेकांच्या साथीची बेधुंद रात्र पावसाळी
मने एकमेकांची धुंद वेडी भिजूनी मग ओलीचिंब होई
जरा स्पर्श होताच माझा तुजला मग सुटे कंप हाती
नको बंध आता कोणतेच अशा धुंद प्रितराती
मग अलवार माझ्या चाहूलीनं झालेलं तुझं ते ओजस रुप मी बघत राहाणं
अन् ते सुकुमार तेजस वलयकांती स्वरूप मग माझ्या हृदयांतरी साठवणं
सांग ना सखे मग अडाणी अशा या वेड्या पिराला तु नवसंजीवनी देशील का ?
आयुष्याच्या सप्तपदीमय तप्तपदीवर तु कायम मजला साथ देशील का ?
सांग ना सखे मज एकदा नव्यानं तु माझी सर्वांगस्वरूप-आराधिनीरुपी अशी आत्म-अर्धांगिनी होशील का ?
अन् आयुष्यात माझ्या येऊनी मजला पूर्णत्व तु देशील का ?
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #आयुष्याची_तप्तपदी