अडवू नका त्या उर्मट पशूंना माजलेल्या बोकडांना, वळूंना टपून बसलेत गिधाड कर्माची फडशा पडतील क्षणार्धात हिशोब इथच होईल अन्यायाचा पुण्याईची कमाई संपताच पापाची सताड उघडी आहेत दार चांगुलपणाचा , झरा आटू लागलाय कलीचे अंधार साम्राज्य असत्याचा विजय करत आहे सत्य कटू वाटू लागलय असत्याचे काळेकुट्ट ढग सत्यसूर्यावर आले आहेत त्यामुळे सत्याचे अस्तित्व दिसेनासे झालेय असभ्याच्या गर्दी पेक्षा सभ्यतेचा कोपराही चालेल पण कर्माचा न्याय असत्याचे ढग निवळल्या शिवाय सत्याचा नंदादीप दिसणार नाहीं. ©Rajendrakumar Jagannath Bhosale #जाणीव #Hope