Nojoto: Largest Storytelling Platform

सरता सरता पाऊस, हाहाकार माजवून गेला. काठावरचा गा

सरता सरता पाऊस, हाहाकार माजवून गेला.  
काठावरचा गाव माझा, पाण्यात बुडवून गेला. 

रातभर कारभारीण, पावसासंग भांडत राहिली. 
लेकराला घेऊन उराशी, पाण्यातून वाट काढत राहिली. 

होतं-नव्हतं सारं, वाहून गेलं कालच्या पुरामध्ये. 
आजतागायत कृष्णामाई, शिरली नव्हती घरामध्ये.  

मोडलं घराचं छप्पर, कोसळल्या चारी भिंती. 
दगड-विटांच्या ढीगाऱ्याखाली, संसारास मूठमाती. 

खांबावरची 'बा'ची  तसबीर, मात्र हारासकट वाचली. 
उध्वस्त घरटं पाहून, माझी माय आतून खचली. 

माणसानं माणूस तेवढी वाचवला, गुरं-ढोरं गेली वाहून. 
अंगणातील तुळस उभी राहिली, वृंदावनी घट्ट पाय रोवून. 

लेकराचं दप्तर-पाटी,  चिखलामध्ये शोधतो आहे. 
ओसरलेल्या आभाळाकडे, सावली तेवढी मागतो आहे. 

आता काळी माय माझी, आभाळ पाहात बसते. 
कोसळलेल्या पिकांना, जगण्याचं बळ देत बसते. 

                                                           एकलव्य