Nojoto: Largest Storytelling Platform

*मन* मन आज मोरपीस झालय अलगद वाऱ्यावर ,तरंगणारे हलक

*मन*
मन आज मोरपीस झालय
अलगद वाऱ्यावर ,तरंगणारे
हलके होवून भुरुभुरु उडणारे
किती रंग ,आणि कडेने चंदेरी
सोनेरी तरंग,हळूच अक्षांचे फुलपक्षी
होतायेत,कधी या फुलावर त्या 
फुलावर बागडतायेत किती मोहक
स्पर्श होतायेत या नजरेला ,दवबिंदूंचे
मोती ही पर्णपाचूवर बसून अलगद 
घसरतायेत ,त्यांना धरू पाहता 
लाजून विरघळतायेत,ते लाडिक मोती
कधी हातातच येत नाहीत,मात्र स्पर्श्
मात्र शितल होतायेत ,हळूच एक फुल
घेऊन मधुरस प्यावासा वाटतो,आणि 
अलगद नेता अधराजवळ ,त्यात अगोदरच 
मधुमाशीचा मुक्काम असतो
मधूनच एखादा कोळी जाळे फेकतो
आणि मग त्यातच मधुचोर गुंततो
किती ह्या जल्पना सत्यात उतरत असतात
आणि मनाचे वारू उगाचच उधळतात
त्या वादळात हि असतात अनेक 
वादळेआणि उगाच झुलणारे 
निशब्दततेचे हिंदोळे,
त्या हिंदोळ्यावर बसून सर्व 
सुर्ष्टीचे सोहळे डोळ्यात घ्यायचे साठवून
आपण व्ह्यायचे फिजा आणि जायचे
गगनात मुक्त होवून
                  पल्लवी फडणीस,भोर✍
*मन*
मन आज मोरपीस झालय
अलगद वाऱ्यावर ,तरंगणारे
हलके होवून भुरुभुरु उडणारे
किती रंग ,आणि कडेने चंदेरी
सोनेरी तरंग,हळूच अक्षांचे फुलपक्षी
होतायेत,कधी या फुलावर त्या 
फुलावर बागडतायेत किती मोहक
स्पर्श होतायेत या नजरेला ,दवबिंदूंचे
मोती ही पर्णपाचूवर बसून अलगद 
घसरतायेत ,त्यांना धरू पाहता 
लाजून विरघळतायेत,ते लाडिक मोती
कधी हातातच येत नाहीत,मात्र स्पर्श्
मात्र शितल होतायेत ,हळूच एक फुल
घेऊन मधुरस प्यावासा वाटतो,आणि 
अलगद नेता अधराजवळ ,त्यात अगोदरच 
मधुमाशीचा मुक्काम असतो
मधूनच एखादा कोळी जाळे फेकतो
आणि मग त्यातच मधुचोर गुंततो
किती ह्या जल्पना सत्यात उतरत असतात
आणि मनाचे वारू उगाचच उधळतात
त्या वादळात हि असतात अनेक 
वादळेआणि उगाच झुलणारे 
निशब्दततेचे हिंदोळे,
त्या हिंदोळ्यावर बसून सर्व 
सुर्ष्टीचे सोहळे डोळ्यात घ्यायचे साठवून
आपण व्ह्यायचे फिजा आणि जायचे
गगनात मुक्त होवून
                  पल्लवी फडणीस,भोर✍