Nojoto: Largest Storytelling Platform

ॲम्बुलन्सच्या सायरनचा आवाज...🚑🚑 ॲम्बुलन्सच्या स

ॲम्बुलन्सच्या सायरनचा आवाज...🚑🚑

ॲम्बुलन्सच्या सायरनचा आवाज 
आला की,काळजाचा ठोका चुकतो.
गाडीतील रुग्ण सुखरूप घरी पोहचावा हीच
मी मनोमन शुभकामना व्यक्त करतो.
               कोण असेल? कसा असेल ?
               त्याला काय झाले असेल? या 
               असंख्य प्रश्ननांचा खेळ
               एका सायरन ने सुरू होतो.
 मग ॲम्बुलन्समध्येच एक युध्द सुरू होते
 गतीचे गतीशी...
 हृदयाची गती  कमी होऊ नये म्हणून
 गाडीची वाढलेली गती रुग्णालय 
कसोशीने जवळ करत राहते.
                 रस्त्यावरचे युद्ध जिंकले की, मग
                 सुरू होते रुग्णालयातील बेडवरचे युद्ध
                 या दोन्ही युद्धात रुग्ण विजयी होण्यासाठी
                  मदतीचे अनेक हात लढत असतात.
  'प्रत्येक जीव वाचला पाहिजे'.
 या भावनेने  धडपणारे देवदूत
तहान-भूख विसरून
मृत्यूशी रोज लढत असतात. 
        ॲम्बुलन्सच्या सायरनच्या आवाजाला प्रत्येकाने
        जागलं पाहिजे.
        तत्परतेने रस्त्यावर वाट आणि हृदयातून
        सदभावना व्यक्त केली पाहिजे.🚑🚑
      
 








    #ॲम्बुलन्सच्या सायरनचा आवाज🚑🚑
ॲम्बुलन्सच्या सायरनचा आवाज...🚑🚑

ॲम्बुलन्सच्या सायरनचा आवाज 
आला की,काळजाचा ठोका चुकतो.
गाडीतील रुग्ण सुखरूप घरी पोहचावा हीच
मी मनोमन शुभकामना व्यक्त करतो.
               कोण असेल? कसा असेल ?
               त्याला काय झाले असेल? या 
               असंख्य प्रश्ननांचा खेळ
               एका सायरन ने सुरू होतो.
 मग ॲम्बुलन्समध्येच एक युध्द सुरू होते
 गतीचे गतीशी...
 हृदयाची गती  कमी होऊ नये म्हणून
 गाडीची वाढलेली गती रुग्णालय 
कसोशीने जवळ करत राहते.
                 रस्त्यावरचे युद्ध जिंकले की, मग
                 सुरू होते रुग्णालयातील बेडवरचे युद्ध
                 या दोन्ही युद्धात रुग्ण विजयी होण्यासाठी
                  मदतीचे अनेक हात लढत असतात.
  'प्रत्येक जीव वाचला पाहिजे'.
 या भावनेने  धडपणारे देवदूत
तहान-भूख विसरून
मृत्यूशी रोज लढत असतात. 
        ॲम्बुलन्सच्या सायरनच्या आवाजाला प्रत्येकाने
        जागलं पाहिजे.
        तत्परतेने रस्त्यावर वाट आणि हृदयातून
        सदभावना व्यक्त केली पाहिजे.🚑🚑
      
 








    #ॲम्बुलन्सच्या सायरनचा आवाज🚑🚑