White रंग जीवनाचे शब्दवेडा किशोर रंग हे जीवनाचे सुखाचे अन् दुःखाचे कधी रे भाग्याचे येती जाती फिका रे पडतो रंग बळीराजाचा मारा दुष्काळाचा सालोसाली विधवा वीरपत्नी अधुरा संसार तिरंगा आधार लेकरांना असाह्य जीवन आत्महत्या बळीराजाची उघड्या संसाराची परवड पांढरे बगळे मग येती शेतशिवारी ढोंगी त्यांची वारी असे गावोगावी रंगाचा बेरंग चुकता पाऊल तयाची हत्तीची रे चाल असे जीवनात जीवन गणित नाही कुणा कळे फुलवावे स्व-कर्तृत्वानं आयुष्याचे मळे संत सारे आपणा सांगुनिया जाती जसे ज्याचे कर्म तसे फळ रे त्या कर्माचे रंग सारे जीवनाचे ते बदलती ©शब्दवेडा किशोर #रंग_आयुष्याचे मराठी कविता प्रेम