Nojoto: Largest Storytelling Platform

सावली बनुन वावरतो आपली, अपेक्षांच्या उन्हात झिजतात

सावली बनुन वावरतो आपली,
अपेक्षांच्या उन्हात झिजतात पाय...
प्रत्येक हट्टाला पोटाशी घालत आपल्या,
कधी कधी गोंजारतो बनून आपली माय...
स्वप्न आपली पूर्ण करण्यासाठी,
स्वतःचं आयुष्य पणाला तो लावतो...
त्याच्या सुखाची किंमत करावी,
ज्याच्या हृदयात आपण निश्चिंत सामावतो...
चिडा, भांडा, मिठीत घेऊन रडा,
प्रेम तुम्ही करा त्याच्यावर अमाप...
आयुष्यभर आपल्यासाठी झटलेला,
सोडून गेल्यावर खूप आठवत राहतो बाप...
#बाबा
#Happy_Father's_Day
- स्वप्नील हुद्दार

©Swapnil Huddar #FathersDay
सावली बनुन वावरतो आपली,
अपेक्षांच्या उन्हात झिजतात पाय...
प्रत्येक हट्टाला पोटाशी घालत आपल्या,
कधी कधी गोंजारतो बनून आपली माय...
स्वप्न आपली पूर्ण करण्यासाठी,
स्वतःचं आयुष्य पणाला तो लावतो...
त्याच्या सुखाची किंमत करावी,
ज्याच्या हृदयात आपण निश्चिंत सामावतो...
चिडा, भांडा, मिठीत घेऊन रडा,
प्रेम तुम्ही करा त्याच्यावर अमाप...
आयुष्यभर आपल्यासाठी झटलेला,
सोडून गेल्यावर खूप आठवत राहतो बाप...
#बाबा
#Happy_Father's_Day
- स्वप्नील हुद्दार

©Swapnil Huddar #FathersDay