Nojoto: Largest Storytelling Platform

#विशालाक्षर #एका_मिठीसाठी असंख्य क्षणांच्या पायपि

#विशालाक्षर
#एका_मिठीसाठी

असंख्य क्षणांच्या पायपिटीनंतर
एका श्वासाला तरी तुझ्यात रुजवून
जीव फुलवायचाय...

वाट पाहून पाहून जिकिरीस आलेल्या
व्याकुळ नजरेला तुझ्यावर रोवून
पापणी भिजवायचीय...

आणि जवळ येता क्षणीच
जीवापाड कवटाळून
लपवुन टाकायचंय तुला जगापासून...
त्यावेळी जाणवावा फक्त स्पर्श
आणि ऐकू यावीत फक्त स्पंदनं..

तुझ्यात विरघळून
अंग अंग स्पर्शावं आसुसलेलं..
ओलेत्या प्रेमाने
व्यापून टाकावा मनाचा कोपरा न कोपरा..

एका क्षणासाठीतरी स्तब्ध करून
सगळं जग,
मोहरून हे मन,
घेईन तुला इतक्या एकरूप मिठीत
की मनंही दिसतील लख्ख स्पष्ट..
आणि कित्येक मैल खोल असलेल्या 
कप्प्यातल्या आपल्या घरी 
भेटायचंय तुला...

राणी...
एका मिठीसाठी तरी 
भेटायचंय....!!


           - विशाल पोतदार

©Vishal Potdar
#विशालाक्षर
#एका_मिठीसाठी

असंख्य क्षणांच्या पायपिटीनंतर
एका श्वासाला तरी तुझ्यात रुजवून
जीव फुलवायचाय...

वाट पाहून पाहून जिकिरीस आलेल्या
व्याकुळ नजरेला तुझ्यावर रोवून
पापणी भिजवायचीय...

आणि जवळ येता क्षणीच
जीवापाड कवटाळून
लपवुन टाकायचंय तुला जगापासून...
त्यावेळी जाणवावा फक्त स्पर्श
आणि ऐकू यावीत फक्त स्पंदनं..

तुझ्यात विरघळून
अंग अंग स्पर्शावं आसुसलेलं..
ओलेत्या प्रेमाने
व्यापून टाकावा मनाचा कोपरा न कोपरा..

एका क्षणासाठीतरी स्तब्ध करून
सगळं जग,
मोहरून हे मन,
घेईन तुला इतक्या एकरूप मिठीत
की मनंही दिसतील लख्ख स्पष्ट..
आणि कित्येक मैल खोल असलेल्या 
कप्प्यातल्या आपल्या घरी 
भेटायचंय तुला...

राणी...
एका मिठीसाठी तरी 
भेटायचंय....!!


           - विशाल पोतदार

©Vishal Potdar