*गर्द दाटला अंधार सभोवती* *हरवून गेल्या वाटा* *वादळात भरकटे किनारा* *नेती दूर लाटा* *हाती गवसले होते काही* *क्षणांत निसटून गेले* *प्रकाशातले जगणे सरले* *घन अंधारून आले* *क्षणिक सुखाचे रंग फसवे* *मोहवी मन चार क्षणाला* *बहर सरता येई पानगळ* *एकाकी जग भास उद्याला* *नभांगणी तळपती अविरत* *अगणित तेजोराशी* *काळोखाचा श्राप भोगतो* *काजवा मी मंद प्रकाशी* *माझ्याच कोशी गुरफटलो* *विणले अभासी जाळे* *उतरता भोग समाधी* *निवळले गढूळ जळ निळे* ©Shankar kamble #अंधार #काळोख #वाट #वाटा #काळोख😢🖤Fearofdarkness😢काल #Moon