शिवसूर्य आविष्कार ज्यांच्यामुळे जाहला त्यांचा चेहरा डोळ्यापुढे वर्णावा सूर्याआधी नमस्कार पूर्व दिशेस करावा शिवबांप्रमाणेच पहिला दंडवत जिजांऊसारख्या मातेस तो घालावा शिवबांच्या वैचारिक पात्रता आणि कर्तुत्वाचा ठसा प्रत्येकात उमटावा शिवाबांच्या स्मरणांचा आणि सूर्याच्या किरणांचा प्रकाश मनात कायम पडावा शिवबांच्या यशस्वी आणि सूर्याच्या तेजस्वी पणाचा अभ्यास प्रत्येकानी करावा ढगाआड जाऊन तर कधी पल्याड जाऊन केलेला गनिमीकावा प्रत्येकास कळावा कधी सौम्यरुपी शिवबा तर कधी रौद्ररूपी सूर्य बनून जीवन प्रवास हा करावा जगण्यात सूर्य-शिवबा सारखंच जबाबदार आणि रुबाबदारपणा आणावा स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी दिवस आपुला घालवावा कर्मातूनचं प्रत्येकाला वेळोवेळी उजेड हा पुरवावा शिवसूर्य बनून इतिहास किंवा सार्वभौमिक सत्याचा पराक्रम रचावा देवता बनूनी सर्वत्र एक खंबीरपणाचा पाठींबा दर्शवावा खरचं शिवबांसारखा पुन्हा आदर्श व्हावा जाती धर्माचे झेंडे दर्शवणाऱ्यास एकदातरी शिवबा समजावा ©काव्यात्मक अंकुर #शिवसूर्य #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Poet #writing #Poetry #shivajimaharaj #shivjayanti #nojotomarathi