Nojoto: Largest Storytelling Platform

माणूस माणूस माणूस म्हणून जगणाऱ्या दानवाची कथा निर

माणूस

माणूस माणूस म्हणून जगणाऱ्या दानवाची कथा
निर्दयी कपटी लोभी मानवाला बळी पडणाऱ्यांची व्यथा
एकमेकांचे वाइट चिंतीनारी खोटयाची ही दुनिया
यातूनही हित जपणाऱ्यांची धन्य ती किमया

निसर्गाचा अतिवापर प्रगती करण्यासाठी केला
जमीन विकन्याच्या नादात ईमान विकुन बसला
पाण्याच्या नासाडी करून स्वतः तान्हेन मेला
झाडांची तोड़ करूनी स्वतःचा श्वास मात्र संपवला

नात नात म्हणून स्वतः नात्यांचा गळा दाबला
कपटीपणाच्या ऊंच डोंगरावर स्वार्थाचा झेंडा रोवला
मानव जातच आहे जी दुसऱ्यांच सुख हे दुख मानते
स्वतः सुखात राहन्यासाठी वाईटाची ही सीमा ओलांडते

कोणी काही करत असेल तर मागे खेचनारी
कोणी काहीच करत नसेल तर निंदा करणारी
निर्दयी मनाची जातच अशी ही मानवाची
खुप काही कमवल तरी दुःखात संपणारी

  ✒/-अमित लता भिकाजी राऊळ.

amitrawool6959

Amit Rawool

New Creator