Nojoto: Largest Storytelling Platform

सागर तीरी सांजवेळी रोज उमलते एक कळी किंचित हसरी ,

सागर तीरी सांजवेळी
रोज उमलते एक कळी
किंचित हसरी , लाजरी
लाल चूटूक पिवळी

तिला वंदन करते
नारळ अन् पोफळी
देखण्या आभाळी माळ
घालिती पक्ष्यांची फळी

सुंदर अशा कातरवेळी
कुठून उमलली रातकळी
शांत सुगंधित वाऱ्याने
झुलते निद्रेची झोळी

चमचमत्या तारकांनी प्रकाशली
झोपडी वसुधेची चंद्रमौळी
उद्याची आशा घेऊन जवळी
गाढ झोपली सुंदर कळी

पहाटेचा मंद वारा 
सांगून गेला कथा सगळी
अथांग निळ्या आभाळी
उजळली प्रभा सागरजळी

सागरतीरी पूर्व सकाळी
रोज उमलते कळी
किंचित हसरी , लाजरी
लालचुटूक अन् पिवळी #OpenPoetry
सागर तीरी सांजवेळी
रोज उमलते एक कळी
किंचित हसरी , लाजरी
लाल चूटूक पिवळी

तिला वंदन करते
नारळ अन् पोफळी
देखण्या आभाळी माळ
घालिती पक्ष्यांची फळी

सुंदर अशा कातरवेळी
कुठून उमलली रातकळी
शांत सुगंधित वाऱ्याने
झुलते निद्रेची झोळी

चमचमत्या तारकांनी प्रकाशली
झोपडी वसुधेची चंद्रमौळी
उद्याची आशा घेऊन जवळी
गाढ झोपली सुंदर कळी

पहाटेचा मंद वारा 
सांगून गेला कथा सगळी
अथांग निळ्या आभाळी
उजळली प्रभा सागरजळी

सागरतीरी पूर्व सकाळी
रोज उमलते कळी
किंचित हसरी , लाजरी
लालचुटूक अन् पिवळी #OpenPoetry