Nojoto: Largest Storytelling Platform
vinitakadamkadam8332
  • 5Stories
  • 35Followers
  • 31Love
    0Views

Vinita Kadam Kadam

I m a teacher...poet....story writer

  • Popular
  • Latest
  • Video
00f939e805103c5d3065355b3076b45a

Vinita Kadam Kadam

जीवन फक्त डोंबाऱ्याचा खेळ
जन्म मृत्यूचा मेळ
 धडपड पोटी जन सकळ
स्वार्थी आत्मसुखाचा काळ

सुख दुः खाचा लपंडाव
तव मोडीसी आयुष्याचा डाव
हेच करिती रंक आणि राव
नाशिवंत देहासाठी उगाच आणीसी आव

00f939e805103c5d3065355b3076b45a

Vinita Kadam Kadam

"खयाल" था "उडान" से
"आसमान" को छूने का
"हौसला" था "बुलंद"
"इरादा मंजिल" पाने का

सवाल था "सरहदों" का
जिम्मा अपने "वतन" का 
आग लिये दिल में
"अस्तित्व" अपने "वजूद"  का 

जयहिंद
🙏🇮🇳🙏
00f939e805103c5d3065355b3076b45a

Vinita Kadam Kadam

"साथ"
तुझी माझी ओळख स्मरते
अजुन त्या क्षणाची
गंध चाफ्याचा होता
साथ काजव्यांची

तुझे नयन बिंब पाहता
आली प्रचिती प्रतिमेची
तरंग जलबिंदूचा होता
लाट हळव्या प्रेमाची

येता कांती फुलुनी तुझी
मादक नाव यौवनाची
तेज चांदण्यांचे होते
साक्ष त्या चंद्राची.. #HumTum
00f939e805103c5d3065355b3076b45a

Vinita Kadam Kadam

सागर तीरी सांजवेळी
रोज उमलते एक कळी
किंचित हसरी , लाजरी
लाल चूटूक पिवळी

तिला वंदन करते
नारळ अन् पोफळी
देखण्या आभाळी माळ
घालिती पक्ष्यांची फळी

सुंदर अशा कातरवेळी
कुठून उमलली रातकळी
शांत सुगंधित वाऱ्याने
झुलते निद्रेची झोळी

चमचमत्या तारकांनी प्रकाशली
झोपडी वसुधेची चंद्रमौळी
उद्याची आशा घेऊन जवळी
गाढ झोपली सुंदर कळी

पहाटेचा मंद वारा 
सांगून गेला कथा सगळी
अथांग निळ्या आभाळी
उजळली प्रभा सागरजळी

सागरतीरी पूर्व सकाळी
रोज उमलते कळी
किंचित हसरी , लाजरी
लालचुटूक अन् पिवळी #OpenPoetry
00f939e805103c5d3065355b3076b45a

Vinita Kadam Kadam

आपल्याच लोकांनी रान पेटवलं म्हणून कपाळावरचं कुंकू कधी हसलंच नाही.. वरूण राजा बरसून  गेला तरीही माझं वांझूटपण अजून संपलंच नाही...


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile