Nojoto: Largest Storytelling Platform

#विशालाक्षर #विशालाक्षर_अध्यात्म काळोखात मन नेऊन

#विशालाक्षर
#विशालाक्षर_अध्यात्म 

काळोखात मन नेऊन ठेवताच, काही क्षणातच दृष्टी सरावते. सगळं काही अस्खलित दिसू लागते, आकार आणि उकारासहित! दिसणारे आणि पाहणारे दोहोंना व्यक्त होण्याची इतकी का घाई? आनंद संपण्याची भीती की दुःखाच्या आगमनाची अस्वस्थता? खरे तर व्यक्त होऊन असंख्य वलय निर्माण करण्यापेक्षा, एक निरव शून्य दिसावे इतकीच ती काय आस असते.

दृष्टी सरावणारच. तिचा तो धर्मच! मुळात अंधारात आकार शोधून सतत काहीबाही अर्थ लावत बसण्याची ईच्छा विझायला हवी. शून्याने शून्यावर काहीही क्रिया केली, तरी शून्यच उरते. विषयभोग, आनंद-दुःख, प्रतिमा, अर्थ, अनर्थ हे काहीही नसते. तेथे अंधारही शुद्ध काळा दिसतो आणि मनात असते.. घनदाट समाधान!

© विशाल पोतदार

©Vishal Potdar