Nojoto: Largest Storytelling Platform

पाऊस ऊन वारा त्यात इंद्रधनू साजरा कसा विसरावा, सा


पाऊस ऊन वारा
त्यात इंद्रधनू साजरा
कसा विसरावा, सांगा?
हा बालपणीचा नजरा

हे वादळ जोरात
वीज कडकडते नभात
हे वादळाचे वय
कसे सांगू मी शब्दात

पडलं कडक ऊन
त्यात वाळवंटी वाट
पाणी मिळेना मिळेना
तरी पाण्याच्या शोधात

आता थांबलं वादळ
घरी नांदल गोकुळ
मी सागरी पोहतो
तरी संसारी बुडलो

हिरवगार झाड होतं
कसं  झुरुन गेलंय
त्याची निव भागवाया
नवं रोपट आलंय

निसर्ग शांत झाला
संध्या दाटून आली
एका सूर्याची कहानी
आज येथेच संपली आयुष्य हे....
 #आयुष्य #bestmarathiquotes #yqtaai #nature #age 
#lifejourney  #जीवनप्रवास

पाऊस ऊन वारा
त्यात इंद्रधनू साजरा
कसा विसरावा, सांगा?
हा बालपणीचा नजरा

हे वादळ जोरात
वीज कडकडते नभात
हे वादळाचे वय
कसे सांगू मी शब्दात

पडलं कडक ऊन
त्यात वाळवंटी वाट
पाणी मिळेना मिळेना
तरी पाण्याच्या शोधात

आता थांबलं वादळ
घरी नांदल गोकुळ
मी सागरी पोहतो
तरी संसारी बुडलो

हिरवगार झाड होतं
कसं  झुरुन गेलंय
त्याची निव भागवाया
नवं रोपट आलंय

निसर्ग शांत झाला
संध्या दाटून आली
एका सूर्याची कहानी
आज येथेच संपली आयुष्य हे....
 #आयुष्य #bestmarathiquotes #yqtaai #nature #age 
#lifejourney  #जीवनप्रवास