*आवेशाची ललकारी* *विरून गेली सांग कुठे?* *अंगाराची धग ही निवली* *मशाल विझली सांग कुठे?* *अन्यायाच्या दारी याचक* *न्याय बिचारा तिष्ठतसें* *बटीक होवून करी चाकरी* *दाद मागू सांग कुठे?* *न्याय, धर्म अन नीतीचे* *वस्त्रहरण हे इथे रोजचे* *लाज झाकण्या धर्माची* *कृष्ण राहिला सांग कुठे?* *सैल झाली वज्रमूठ अन* *बोथट झाला म्यान भाला* *स्वाभिमाना कलम गर्दनी* *धार लोपली सांग कुठे?* *जाती-पाती मधे अडकला* *रंगा-झेंड्यामध्ये विखुरला* *जात मानव एक विसरला* *कोण चुकला?सांग कुठे?* *सळसळणारा धमन्यांमधला* *तप्त शीलारस गोठून गेला* *बधीर त्या जाणीवा, वेदना* *मूक झाल्या सांग कुठे?* ©Shankar kamble #न्याय #अन्याय #लढा #झुंज #विद्रोही #लढायचं #Dark