a-person-standing-on-a-beach-at-sunset #बांध शब्दवेडा किशोर अपेक्षांना माझ्या बांध घातले जरी मी पण भावनांना कसे आवरू सांगा कुणी लग्नानंतर पहिला बांध माझ्या मनास घातला की आता नाही करायचा तुला कसलाही चंचलपणा दुसरा बांध घातला माझ्या त्या ओठांना की आता जप तु अन् सांभाळून वापर शब्दफेकीला तिसरा बांध घातला नयनांना की त्याच्या व्यतिरिक्त न बघणे कुणा चौथा बांध मित्रमैत्रिणी अन् सग्यासोयऱ्यांना की सासर व माहेर दोन्ही घराच्या इभ्रतीला सोडून आता सगळे असावे फक्त वायफळपणा पाचवा बांध माझ्या खाण्यापिण्याला की जे उरेल सरतेशेवटी ते मी खाणेपिणे सहावा बांध माझ्या त्या पैसे खर्च करण्याला की नेहमीच कर काटकसरपणा सातवा बांध माझ्या कपडे लेण्याला की आता प्राधान्य फक्त द्यावे जे आवडे त्याला तेच परिधान करण्याला आठवा माझ्या शरीरावरील हक्काला इथे पण भावनांचा होई रोजच चुराडा नववा बांध मुलांसाठी सर्वस्व अर्पणाला पाखरांनी घेतली भरारी ती कायमचीच दहावा बांध आत उफाळणाऱ्या ज्वालांना स्फोट तर रोजचं पण ऐकणारे कुणीच नाही सांगा आता घालू अजून बांध कोठे आणि किती सगळी कामापुरतीच गोडबोली स्वार्थी नाती जिथे भावनांना रोजच तिलांजली द्यायची अन् विचार करावा की असेल उद्या तरी आपला दिवस सुखाचा समजावून सांगावे हेच कायम मीच समाधान मानणाऱ्या त्या माझ्या मनाला ©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून