White #जाताना तरी आज एकदा माझी होऊन जा...... शब्दवेडा किशोर जाताना तरी आज एकदा माझी होऊन जा त्या शेवटच्या भेटीमध्ये मज आयूष्यभराची साथ तू देऊन जा भावनांना आवरन्याचं काम माझं मी करेन कसबसा एकदा तरी तुझा हात माझ्या हातात देऊन जा जाताना तरी आज एकदा माझी होऊन जा...... खूप काही साठले आहे मनात माझ्या ते निदान आज तरी तू ऐकून जा डोळ्यात साठलेले तुझ्या प्रेमाचे अलवार चाहूलीगत ते भाव तुझ्याच त्या डोळ्यांनी वाचून जा जाताना तरी आज एकदा माझी होऊन जा...... कळत नकळत जन्मलेल्या ह्या नात्याला तु तुझ्या विश्वासाची साथ देऊन जा पुढे कधी भेटू न भेटू पण या घायाळ मनावर तुझ्या प्रेमाची फुंकर घालून जा जाताना तरी आज एकदा माझी होऊन जा...... ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_पुस्तकातून