White #चंद्राच्या साक्षीने आज.. शब्दवेडा किशोर चंद्राच्या साक्षीने आज मन माझे मी तुज अर्पियेले काय करायचे तयाचे मी फक्त भाव जाणिले दुःख कुणाच्या वाट्याला आलं नाही असे जीवनच कुणाचे झाले नाही सोबत असेन मी तिमिरातही अन् तेजातही चंद्राच्या साक्षीने आज.... ||१|| चंद्राच्या साक्षीने काजव्यांची रात्र होऊन तु अशी यावी लाजूनी हा चंद्रदेखील मग नभाआड जावा प्रेमाचा रंग तुझ्यावाटे चांदण्यात भरवून त्या चांदण्यांना सुद्धा तुझी मग मोहीनी पडावी रातराणीचा गंध होऊन सदा तू माझ्या तनामनात दरवळावी मन आतुरले तुझी पाहुनी वाट डोळे भरुनी आले दाट मला तुझेच व्हायचे आहे घालतो कायम मी हीच तुजला माझ्या अस्तित्वामधूनीया साद चंद्राच्या साक्षीने आज....||२|| मी तुझाच प्रियवर गं झालो तुज समर्पित झालो मी खुशीखुशी सुखात चिंब न्हाऊनिया गेलो असे माझ्या मनी फक्त एकच आस की आपल्या युगलांची स्वप्ने पूर्ण व्हावीत भावनांनाचे पाश नष्ट होऊन अनादिअनंत आपल्या अनमोल नात्याची लतिका ही अशीच कायम एकरूप रहावी घेतो शपथ मी की लवकरच आपल्या नात्याचा नव्याने मी आयुष्यअध्यायाचा एक नवा शुभारंभ करणार या शुभ्रधवल चंद्राच्या साक्षीने आज....||३|| ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर