Nojoto: Largest Storytelling Platform

*का माणुसकी हरवली..!* *वर्णसंख्या(९/७/९/७)* *****

*का माणुसकी हरवली..!*

*वर्णसंख्या(९/७/९/७)*
***************************
का हरवली माणुसकी
कळत नाही *खरे,*
स्वार्थासाठी सरसावले
ढोंगी पहा *चेहरे.*

मीपणात विसरून गेले
नात्यातील *अंतर,*
मनालाही कळले नाही
प्रेमातील ते *सार.*

आज कुठे देव राहिला
कोणालाही ना *कळे,*
माणसातील खरा भाव
सतत दूर *पळे.*

रक्ताची नाती खरंतर
फसवीच *निघाली,*
समोरासमोर देखील
खोटे बोलू *लागली.*

स्वतःच्याच त्या स्वार्थासाठी
माणुसकी *सोडली,*
आपलेपणात मनाची
व्यथा सारी *मांडली*

-----------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
 -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke का हरवली माणुसकी
*का माणुसकी हरवली..!*

*वर्णसंख्या(९/७/९/७)*
***************************
का हरवली माणुसकी
कळत नाही *खरे,*
स्वार्थासाठी सरसावले
ढोंगी पहा *चेहरे.*

मीपणात विसरून गेले
नात्यातील *अंतर,*
मनालाही कळले नाही
प्रेमातील ते *सार.*

आज कुठे देव राहिला
कोणालाही ना *कळे,*
माणसातील खरा भाव
सतत दूर *पळे.*

रक्ताची नाती खरंतर
फसवीच *निघाली,*
समोरासमोर देखील
खोटे बोलू *लागली.*

स्वतःच्याच त्या स्वार्थासाठी
माणुसकी *सोडली,*
आपलेपणात मनाची
व्यथा सारी *मांडली*

-----------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
 -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke का हरवली माणुसकी

का हरवली माणुसकी #poem