Nojoto: Largest Storytelling Platform

हे निरभ्र आकाशा मला तुझ्या मिठीत सामावून घे... तुझ

हे निरभ्र आकाशा मला तुझ्या मिठीत सामावून घे...
तुझा ढगाळलेला अवतार पाहुनी मनाची हुरहूर वाढलीय..
अस्वस्थता मनाला घेरून टाकतेय,
सांग आकाशा,का? मला तुझ्या मेघांच्या सरीबरोबर गर्जनाऱ्या ध्वनीने जुन्या आठवणीतल्या त्या दिवसांना आज पुन्हा जागे केलंय...
सांग आकाशा,का? मी तुझ्या त्या पडणाऱ्या सरींच्या थेंबात पण माझ्या डोळ्यातील अश्रूंना लपवण्याचा प्रयत्न करतोय...
रोज अस्पष्ट वाटणारा तो चेहरा तुझ्या पडणाऱ्या विजेच्या लख्ख प्रकाशात स्पष्ट दिसून वेदनांचा बाजार मांडतोय...
आकाशा मला तुझ्यात सामावून घे,नव्या उमेदीने पुन्हा जगण्याचा आयाम दे... #आकाशा