व्हय मी फुल्यांची। सावित्री बोलत्या आव बाई माणसानं फकस्त पोरं ढोर रांधा वाढा अन उष्ठी काढा एवढंच होत पण आमच्या शेटजी मूळ मी साळा शिकली एवढंच काय दीन दुबळ्या समाजातील लेकींना मी पुढं शिकवलं, पण इथल्या सनातन्यांना हे काय बघावतय होय आव साळला जातांना दोन लुगडी घिऊन जायची जाताना हे सवर्ण माझ्या अंगावर शेण चिखल टाकायचे पण मी कधी डगमगले नाही आमचे हे शेटजी असायचे मागे काठी घेऊन अन मी आनंदाने हे शिक्षणाचे रोपटे लावले अन ते फुलवल आता या सावित्री च्या लेकींनी शिक्षणाचा वटवृक्ष केलाय सर्वांना या बालिका दिनाच्या माझ्याकडून शुभेच्छा नमस्कार ©rajendrakumar bhosale #बालिकादिन #bye2020