Nojoto: Largest Storytelling Platform

एखाद्या भयाण संकटाला पुरून उरणे त्याचा नाश आणि बि

एखाद्या  भयाण संकटाला पुरून उरणे
त्याचा नाश आणि बिमोड करणे
हे नेहमीच सोपे वाटते 
पण बाबांना मिठी मारणे नेहमीच अवघड असते

बाबासोबत बोलणे ,राहणे ,
त्याच्यासोबत भांडणे ,त्यांतून प्रेम मिळवणे
हे नेहमीच सोपे वाटते
पण बाबांना मिठी मारणे नेहमीच अवघड असते

एखादा यशाचा शिखर गाठणे
त्यावर विजय पताका लावणे 
हे नेहमीच सोपे भासते
पण बाबांना मिठी मारणे नेहमीच अवघड असते

बाबांच्या मनात येत असेल
मुलांचे आपल्यावर खूप प्रेम असेल
समोर दिसताच तो आपल्या कुशीत बसेल
मुलांना मिठीत घेणे बाबांचा पण हाच हेतू असेल
पण मुलांना मनात येत असेल की 
बाबांच्या मिठीत जाणे बाबांना कसे वाटत असेल

शेवटी राहून जाते ती मिठी
आणि खूप काही बोलायचे असते
योग्य ती वेळ तेव्हा निघून गेलेली असते
आणि बाबांना मिठी मारण्याची वेळ चुकलेली असते

योग्य वेळ असतानाच ज्याच्या एक विचार मनात येईल
बाबांच्या एक वेळ तरी जो त्यांच्या मिठीत जाईल
तुमच्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आणि ओठावर स्मित हास्य येईल
प्रेमळ हेवेदावे एक नवे रूप घेईल
बाबांना मारलेली मिठी ही नेहमीच लक्षात राहील
म्हणूनच बाबांच्या मिठीत जो जाईल तो नेहमी खुश राहिल

कवी हरिश्चंद्र मुकुंद दळवी
मु. डोंगरन्हावे,पोस्ट म्हसा,
तालुका मुरबाड,जिल्हा ठाणे (421401)
साकेत महाविद्यालय कल्याण पूर्व
कला शाखा तृतीय वर्ष अर्थशास्त्र विभाग
9503584135 एक राहून गेलेली मिठी

एक राहून गेलेली मिठी #Life_experience