White #नात्यांचे हे धागे.... शब्दवेडा किशोर सुखदुःखाचे अनेक चढउतार जीवनात सदा येतात वळणावळणाचे अनेक रस्ते काट्याकुट्यातून जातात दुःखाचे ते काटे सारून जीवनात सुखाची फुले पेरावी आयुष्याच्या अनमोल पुस्तकाची पाने सतत चाळावी येतो दुःखाचा कधी उन्हाळा कधी असे मग सुखाचा तो वारा आयुष्यातील दिवस बघा कसे पळती झरझरा सुखदुःखाची ही लपाछपी नियतीचा हा खेळ चाले जणू असे लपंडाव दुःखा मागून येते सुख जरा अंतर्मुख व्हावं एक धागा सुखाचा तर शंभर धागे दुःखाचे आयुष्याचे हे विनले वस्त्र उभ्या आडव्या नात्यांच्या धाग्यांचे ©शब्दवेडा किशोर #नातं_तुझं_नी_माझं