Nojoto: Largest Storytelling Platform

|| दिवाळी || लागले दिवे दारी उजळल्या ज्योती रंगा

|| दिवाळी ||

लागले दिवे दारी
उजळल्या ज्योती 
रंगात रंगली रांगोळी अंगणी
आली दिवाळी ही घरोघरी 
सजले स्वयंपाक घर                                     
गृहिणीच्या हाती रेसिपी                                      
फराळाची ही मेजवानी                                      
आली दिवाळी ही घरोघरी                                       
                      लागला पहिला दिवा दारी
                    ओवाळी बळीराजा गाई पाडसासी
                    आंनदाची अन उत्सवाची
                     आली दिवाळी ही घरोघरी
रोषणाईत सजली नगरी                                   
लक्ष्मीची पाऊले आली दारी                                  
नव चैतन्य घेऊन                                  
आली दिवाळी ही घरोघरी                                    
                      अभ्यंग स्नानाची पहाट ही सजली
                   सुगंधी उटण्यात नाहली
                      फटाक्यांच्या आतषबाजीत रंगली
                      आली दिवाळी ही घरोघरी 
उत्सव नात्यांचा रंगला दारी                                 
ओवाळी बहिन भावासी                                 
हर्ष उल्हासाची                               
आली दिवाळी ही घरोघरी                 शैलेश बदे...✍️✍️

©shailesh bade दिवाळी

#Diwali
|| दिवाळी ||

लागले दिवे दारी
उजळल्या ज्योती 
रंगात रंगली रांगोळी अंगणी
आली दिवाळी ही घरोघरी 
सजले स्वयंपाक घर                                     
गृहिणीच्या हाती रेसिपी                                      
फराळाची ही मेजवानी                                      
आली दिवाळी ही घरोघरी                                       
                      लागला पहिला दिवा दारी
                    ओवाळी बळीराजा गाई पाडसासी
                    आंनदाची अन उत्सवाची
                     आली दिवाळी ही घरोघरी
रोषणाईत सजली नगरी                                   
लक्ष्मीची पाऊले आली दारी                                  
नव चैतन्य घेऊन                                  
आली दिवाळी ही घरोघरी                                    
                      अभ्यंग स्नानाची पहाट ही सजली
                   सुगंधी उटण्यात नाहली
                      फटाक्यांच्या आतषबाजीत रंगली
                      आली दिवाळी ही घरोघरी 
उत्सव नात्यांचा रंगला दारी                                 
ओवाळी बहिन भावासी                                 
हर्ष उल्हासाची                               
आली दिवाळी ही घरोघरी                 शैलेश बदे...✍️✍️

©shailesh bade दिवाळी

#Diwali