Nojoto: Largest Storytelling Platform

White तुझं माझं - माझं तुझं असं कधीही मुळीच नसायचं

White तुझं माझं - माझं तुझं
असं कधीही मुळीच नसायचं..
आपल जणू सारं काही
असच नेहमी भासायचं..

खिशात दमडी नसताना 
बिनधास्त आपण असायचं..
मिञ आहे म्हणून कोणी
टेंशन कसलं घ्यायचं...

उधारीच्या जगण्याला
कोण कशाला भ्यायचं..
पगार कधी झाल्यावर 
ज्याचं त्याचं द्यायचं..

नसले कुणाकडे पैसे तरी
तांदळाला शिजवायचं..
गुण्या गोविंदाने भाताला 
शिजवून साऱ्यांनी संपवायचं..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  रूम मेट स  पार्ट २

रूम मेट स पार्ट २ #मराठीकविता

99 Views