White #आज क्षणभर विसावलोय.... शब्दवेडा किशोर आज क्षणभर विसावलोय मी तुझ्या हातावर पण पुन्हा उंच भरारी घ्यायची आहे मला काही क्षण मोकळा श्वास घेऊ दे जरा विस्तीर्ण आभाळ खुणावतंय मला होऊनिया माझ्या स्वप्नांचे श्वास तु दे माझ्या पंखांना नव्यानं उडण्याचे सामर्थ्य जगण्यात माझ्या भर नव्यानं तुला हवे ते रंग सोनेरी नशिबाचे दे एक नवा आकार तु माझ्या आयुष्याला कर साकार एका नव्या अस्तित्वसूर्याला ©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून