Unsplash #माझ्या आयुष्याचे पुस्तक.... शब्दवेडा किशोर थांबली पुन्हा आज लेखणी माझी अन् पुन्हा जरासे अडखडळे माझ्या शब्दांचे ते मर्मबंधमय श्वास वाटलं मनी की नको पुन्हा ती कवितेची ही गुंफण ओळींचा पुन्हा झाला जरासा ऱ्हास पुन्हा नको ते गुंतणे कुणात कुणी म्हणायला पुन्हा की अरे रडू नको जरासा मनमुराद तु पुन्हा नव्यानं हास वाटे मनी माझ्या आता की शेवट करावा या साऱ्या भाव भावनांचा अन् नसावं आता कुणी मनात माझ्या खास निजधामी आता मी आनंदाने गमन करावे आत्म्यात ठेऊनी ती फिरुनी नव्यानं जन्मण्याची ती आस ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर