Nojoto: Largest Storytelling Platform

❤️अबोल आर्तमन❤️ दीर्घ श्वास घेऊनी मी पुन्हा तुलाच

❤️अबोल आर्तमन❤️
दीर्घ श्वास घेऊनी मी पुन्हा तुलाच स्मरतो आहे..
अवकाशातील शुभ्र रंग तो उदास होऊनी सरतो आहे..

सरत असत्या रंगासम बघ प्रेम ही माझे शुद्धच आहे 
सारे काही असूनही आता तू नसणे ही हद्दच आहे..

खूप विचार केल्या नंतर मजला आता कळते आहे..
मी सोडोनी तुझे आर्तमन दुमार्गासी वळते आहे

अश्या विचारांमुळेच माझे मुक शांत मन जळते आहे..
'सोडून दे तू तिजला' म्हणत गर्द सांज मज छळते आहे..

या सांजेसी समजुनी सांगुनी मी ही आता थकलो आहे..
तुजवरच्या या प्रेमामध्ये कुठे नेमका चुकलो आहे..

आज पुन्हा मी अबोल असत्या आर्तमनाशी भांडत आहे..
कधी येशील तू एक प्रश्न हा त्या पाशी मी मांडत आहे..

कधी येशील तू एक प्रश्न हा त्या पाशी मी मांडत आहे..
🏮सायंकाळच्या कविता 🏮
✍️व्यंकटेश विनायक कुलकर्णी✍️
🎊2025🎊
❤️कोल्हापूर ❤️

©Vyankatesh Kulkarni 🎊..2025 अबोल आर्तमन..🎉

🎊..2025 अबोल आर्तमन..🎉

99 Views