Nojoto: Largest Storytelling Platform

गुन्हा...! आज आभाळ भरून आलंय बघ पुन्हा......! मनी

गुन्हा...!

आज आभाळ भरून आलंय बघ पुन्हा......!
मनी आठवणींचा पाऊस बरसला बघ जुना.......!
हर एक थेंब एक कहाणी ,हर एक थेंब एक फसाना...!
हा पाऊस सोडून गेला फक्त आठवणींच्या खुणा...!
चिंब भिजून पापणी बघ बिलगली आसवांना...!
काळजात पेटलेला विरह- वणवा त्या आसवानांही  शमेना ...!
ऋतू आठवणींचा हा उलटून जाईल ,
उरेल फक्त एकांत सुना सुना...!
पण सखे..मी करेन तुला आठवण्याचा गुन्हा पुन्हा पुन्हा....!

©Santosh Jadhav
  #गुन्हा