Nojoto: Largest Storytelling Platform

अक्षर छंद अभंग लेखन ६ /६ /६ /४ विद्यावि

अक्षर छंद अभंग लेखन
          ६ /६ /६ /४

विद्याविभूषित ! तू श्री गजानना !
पार्वतीनंदना ! विघ्नेश्वरा !! १ !!

अंतरासी माझ्या ! भक्तीचे ठिकाण ! 
तुझे अधिष्ठान ! दृढ केले !!२!!

कराया तुमची ! गणराया स्तुती !
द्यावी मज स्फूर्ती ! वक्रतुंडा   !!३!!

आत्मा परमात्मा ! नमो गणेश्वरा !
तूच सर्वेश्वरा ! दीनबंधू !!४!!

गुणगान गाता ! देही नांदणारे !
अवगुण सारे ! लया जाती !!५!!

तुझाच आसरा ! असे लेकरांना !
नित्य पामरांना ! सुवर्णकाळ !!६!!

विनवीते स्मिता ! सारे कृपावंत !
व्हावे दयावंत ! चराचरी  !!७!!

©Smita Raju Dhonsale अक्षर छंद अभंग लेखन
          ६ /६ /६ /४

विद्याविभूषित ! तू श्री गजानना !
पार्वतीनंदना ! विघ्नेश्वरा !! १ !!

अंतरासी माझ्या ! भक्तीचे ठिकाण ! 
तुझे अधिष्ठान ! दृढ केले !!२!!
अक्षर छंद अभंग लेखन
          ६ /६ /६ /४

विद्याविभूषित ! तू श्री गजानना !
पार्वतीनंदना ! विघ्नेश्वरा !! १ !!

अंतरासी माझ्या ! भक्तीचे ठिकाण ! 
तुझे अधिष्ठान ! दृढ केले !!२!!

कराया तुमची ! गणराया स्तुती !
द्यावी मज स्फूर्ती ! वक्रतुंडा   !!३!!

आत्मा परमात्मा ! नमो गणेश्वरा !
तूच सर्वेश्वरा ! दीनबंधू !!४!!

गुणगान गाता ! देही नांदणारे !
अवगुण सारे ! लया जाती !!५!!

तुझाच आसरा ! असे लेकरांना !
नित्य पामरांना ! सुवर्णकाळ !!६!!

विनवीते स्मिता ! सारे कृपावंत !
व्हावे दयावंत ! चराचरी  !!७!!

©Smita Raju Dhonsale अक्षर छंद अभंग लेखन
          ६ /६ /६ /४

विद्याविभूषित ! तू श्री गजानना !
पार्वतीनंदना ! विघ्नेश्वरा !! १ !!

अंतरासी माझ्या ! भक्तीचे ठिकाण ! 
तुझे अधिष्ठान ! दृढ केले !!२!!