Nojoto: Largest Storytelling Platform

आज पुन्हा तिला साडीमध्ये पाहिले मी, तिच्या रूपाच्

आज पुन्हा तिला 
साडीमध्ये पाहिले मी,
तिच्या रूपाच्या चांदण्यात 
पुन्हा न्हाऊन गेलो मी

मखमली असे डोळे तिचे, 
गालावर पडली होती खळी,
मोकळे केस, कपाळी टिकली, 
जणू नव्याने खुलली होती कळी

गळ्यात तिच्या हार होता मोत्याचा,
हृदयाच्या पार गेला होता तिचा तिर नजरेचा
हलकेच निरागस हसण्याने का तिच्या,
विसर पडला होता मला साऱ्या जगाचा

रातराणी परी ती दरवळलेली
क्षणात मदहोष होवून गेलो मी
सावली जशी, उन्हात पडावी
तशीच मला, बिलगुन गेली ती

ह्रदयात स्पंदन निर्माण झाले
प्रेमाचे पाखरु नभी उडु लागले
पाहून तिच्याकडे, मजला का कित्येक 
जन्मांचे माझे नि तिचे नाते दिसु लागले

©Mangesh Kankonkar Lovebirds

#lovebirds
आज पुन्हा तिला 
साडीमध्ये पाहिले मी,
तिच्या रूपाच्या चांदण्यात 
पुन्हा न्हाऊन गेलो मी

मखमली असे डोळे तिचे, 
गालावर पडली होती खळी,
मोकळे केस, कपाळी टिकली, 
जणू नव्याने खुलली होती कळी

गळ्यात तिच्या हार होता मोत्याचा,
हृदयाच्या पार गेला होता तिचा तिर नजरेचा
हलकेच निरागस हसण्याने का तिच्या,
विसर पडला होता मला साऱ्या जगाचा

रातराणी परी ती दरवळलेली
क्षणात मदहोष होवून गेलो मी
सावली जशी, उन्हात पडावी
तशीच मला, बिलगुन गेली ती

ह्रदयात स्पंदन निर्माण झाले
प्रेमाचे पाखरु नभी उडु लागले
पाहून तिच्याकडे, मजला का कित्येक 
जन्मांचे माझे नि तिचे नाते दिसु लागले

©Mangesh Kankonkar Lovebirds

#lovebirds