मुलगी दोन वर्ग कमी शिकली असेल तरी चालेल पण घर संसार नीट सांभाळणारी असावी गरिबीची लाज करून ताने देणारी नको तर मिळतं त्यात Adjust करून घर सांभाळणारी असावी... पुस्तकी ज्ञान फारसं नसलं तरी चालेल पण पारिवारिक अनुभव असणारी असावी नुसता पैसा पैसा करून नवरा नवरा च करणारी नको तर म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची सेवा करणारी असावी... नुसती पूजा पाठ करणारी नसली तरी चालेल पण आपल्या स्वभावाने घरात सुगंध पसरवणारी असावी जसं मनात द्वेष न ठेवता माहेरच्या लोकांशी वागते तसंच सासरच्यांना समजून घेणारी असावी... फार काही अपेक्षा नसते मुलांची बायकोकडून फक्त ती घराला घरपण देणारी असावी नुसती नवऱ्याची बायको म्हणून येणारी नको तर आई बाबांचा सांभाळ करणारी मुलगी सुद्धा असावी... प्रेमळ स्वभावाने सुखी संसार बहरतो कधीही पण क्षुल्लक कारणासाठी घर तोडणारी नसावी नुसती माझं खरं म्हणून वारंवार वाद करणारी नको तर सगळ्यांच्या मनात घर करणारी असावी... ©कधी प्रेम कधी विरह #GateLight