तुला वाटते मी सोडून सगळे पाश, आणि सोडावा मी श्वास सगळेच बंध सुटून जातील आणि मग एकमेकातून मोकळे होतील मी तरी कुठे अडकायचे म्हणते,मी ही जिवंत असून रोजच मरते आता हा श्वास ,ही भास वाटतो उगाच खोल उसाशांनी गळा दाटतो उगाच देह जीर्ण करून ,मरणाची वाट बघत कशाला जगायचे,फुला सारखा देह ,सोडून निर्माल्य होवून वाहत्या पाण्यात वाहत जायचे माझी डोळ्यांची निरांजने ,रोज देवाला ओवाळतात त्यातील ज्योती हळूवार विझण्याची वाट पाहत असतात पण कधी तरी त्याचे,मला निरोप असतात,अजून तुझ्या कर्माच्या मी गाठी सोडवतोय ,आणि बळेच वेळेला मी अडवतोय , जेंव्हा सुटतील सगळ्या गाठी,तेंव्हा मी केवळ तुझा असेल आणि तुझा विरक्त आत्मा माझ्यासाठी पल्लवी फडणीस,भोर✍