#ओला दुष्काळ पाणीच पाणी होऊन बसले काळ्या मातीत रुतून बसले कस कस सांगू ये पावसा तुला सगळं जीवन बरबाद झाले कस जपावं पीक शेतामधलं कस सोसाव पीक वाहून गेलेल कस कस सांगू ये पावसा तुला सगळ आयुष्य मातीमोल झालं कस तोंडातला घास काढून नेल कस जीवनातल जगण संपवलं कस कस सांगू ये पावसा तुला सगळं रान ओल करून टाकलं सगळी स्वप्न धुळीला मिळवली आशाची निराशा करून टाकली कस कस सांगू ये पावसा तुला लय जपल होत,तू नासधूस केली तूच सांग कशी करू घरी दिवाळी आता रोजच होईल शिमगा अन होळी कस कस सांगू ये पावसा तुला आयुष्याची रिकामी झाली झोळी ✍️राजू गायकवाड(कविराज) THE KING OF HEARTS 9604891674 ©कविराज the king of hearts #Barrier