अथांग सागर शब्दांचा त्यात अमुचे काही शब्द ग्रंथ नि काव्यांच्या लाटांवरती थेंब अमुचे अगदी स्तब्ध ||१|| हे स्तब्ध रूप जणू या सागरातील अमुचे प्रतिबिंब मानवी आत्म्याच्या संवेदनांचे अक्षरगंगेशी असलेले अनुबंध ||२|| कितीतरी अक्षरधारा मूक असतील आत्म्यांसोबत रसिक मिळेपर्यंत त्यांनी सोडू नये त्यांची हिम्मत ||३|| कारण तीव्र नव्हे तरी अपमान असेल या सागराचा मंद जर त्या धारा मिळाल्या नाहीत याला अपभ्रंश किंवा स्वच्छंद ||४|| रसिक म्हणजे पर्यटक स्थित या किनारी बेधुंद साहित्यप्रतिभेच्या उन्हात सहज रमणारी ||५|| या अर्णवाच्या गर्भातूनच निर्मिल्या गेल्या संवेदना अस्पष्ट किंवा अपरोक्ष या पाझरल्या माझिया मना ||६|| सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागर शब्दांचा.. #अथांगसागर चला तर मग लिहुया. हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. #collab #yqtaai