लिहिल्या अगोदर कित्येक कविता, आजही कित्येक कविता लिहीत आहे. प्रत्येक कविता लिहिल्यानंतर का वाटते, जसे माझ्या मनातली कविता अजूनही बाकी आहे. कित्येक विषय निवडले,अनेक विषयांवर लिहिले, आई पासून सुरुवात करून बायको विषयावर ही लिहिले. निसर्गावर लिहिले,दऱ्या डोंगरावर लिहिले, मन जुळताच प्रेमावर लिहिले,दुराव्यात विरहावर ही लिहिले. झाले जरी अनेक विषय तरी अनेक विषय अजून बाकी आहे, इतके लिहूनही वाटे माझ्या मनातली कविता अजून बाकी आहे. माझ्या मनातली कविता म्हणजे नक्की काय हेच कळत नाही, लिहितोय खूप काही तरी वाटे अजून काहीच लिहिलेले नाही. शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे माझ्या मनातली कविता... #माझ्यामनातलीकविता चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai