शिवसुर्य शिवविचारांचे मराठीत जेव्हा वादळ उठणार.. बहुतेक स्वराज्य द्रोह्यांना ते नाही पटणार ! साथ जेव्हा शिवविचार व शिवभक्तांची लाभणार.. महाराष्ट्रात मराठीचा नाद तेव्हाचं गुंजणार ! प्रत्येक विचार,मनात "राजे" जन्म घेणार.. भेदभाव मराठी मनातील बाजुला सरणार..! महाराष्ट्रात मराठीला पुन्हा "सुराज्य" लाभणार.. यात शंका ही मुळीच नाही उरणार..! शिवकाळाची सुरुवात ही शिव विचारांनीच होणार.. ज्यावेळी महाराष्ट्रात पुन्हा मावळा सज्ज राहणार.. शिव सुर्य हा प्रत्येक हृदयी तेजाने तळपणार..! "जय शिवराय" श्री: किशोर ज्ञा. रोकडे९०२२५५०३७८ सर्व जाती एक धरुन प्रत्येक मराठी मनाला "मावळा"नावाची उपाधी व सर्वोत्कृष्ट पद मिळवुन देणाऱ्या त्या माझ्या राजांस त्रिवार मानाचा व मनाचा मुजरा...! "जय शिवराय"