Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दसोबती शब्द शब्दात शब्दांनीच शब्दांना कसे शब्द

शब्दसोबती

शब्द शब्दात शब्दांनीच
शब्दांना कसे शब्दबद्ध केले..!!
शब्दकोड्यात  छेडता सुर शब्दसंगीताचे
मज मात्र "शब्दसोबती" बनवले..!!१!!

शब्दांची किमया,शब्दांची ताकद
शब्दनाद पडता कानी,होई आनंद अमर्याद
शब्दबंधनाची मनात एक वेगळीच साद
ओढ राहावी सदैव, लुटण्या शब्ददुनियेचा स्वाद..!!२!!

शब्दसंगतीत राहता शब्दांशीच बोलणे
तृष्णा शब्दरचनेची,शब्दसाथीने शमविणे
मैत्री,प्रेम,बंधुत्व सर्वस्व शब्द समजणे
आलं आस्मानी संकट तरीही शब्दसंगती न सोडणे..
आलं आस्मानी संकट तरीही शब्दसंगती न सोडणे!!३!!

                                                          -विशाल पंडित © #शब्दसोबती...✍️✍️
शब्दसोबती

शब्द शब्दात शब्दांनीच
शब्दांना कसे शब्दबद्ध केले..!!
शब्दकोड्यात  छेडता सुर शब्दसंगीताचे
मज मात्र "शब्दसोबती" बनवले..!!१!!

शब्दांची किमया,शब्दांची ताकद
शब्दनाद पडता कानी,होई आनंद अमर्याद
शब्दबंधनाची मनात एक वेगळीच साद
ओढ राहावी सदैव, लुटण्या शब्ददुनियेचा स्वाद..!!२!!

शब्दसंगतीत राहता शब्दांशीच बोलणे
तृष्णा शब्दरचनेची,शब्दसाथीने शमविणे
मैत्री,प्रेम,बंधुत्व सर्वस्व शब्द समजणे
आलं आस्मानी संकट तरीही शब्दसंगती न सोडणे..
आलं आस्मानी संकट तरीही शब्दसंगती न सोडणे!!३!!

                                                          -विशाल पंडित © #शब्दसोबती...✍️✍️