पुस्तक!! 5 मिनिटे जेव्हा मोबाईल घ्यावा वाटेल तेव्हा पाचच मिनिटे पुस्तक घ्या! उगाच स्क्रोलिंग करण्यापेक्षा खरंच रिडींग करा! पहिला थोडा त्रास होईल जेव्हा हातात पुस्तक येईल! मोबाईल हळूच निघून जाईल आणि पुस्तक हातात येत राहील! पुस्तकातून तुम्ही खूप काही मिळवता अन्यथा स्क्रोलिंग मध्ये, वेळच तर घालवता पाच मिनिटे रेस्ट म्हणत, तासन्तास निघून जातात करायची असलेली कामे मात्र, मोठी मोठी होत राहतात वेळे शिवाय जीवनात आपल्या काहीच होत नाही वेळ निघून गेल्यावर हाती शून्य सुद्धा राहत नाही पुस्तकात हरवलेला माणूस माणसात विरळ असतो मोबाईलात हरवलेला माणूस सर्वत्र दिसतो पुस्तक! #books #mobile #socialmedia #sakhi