Nojoto: Largest Storytelling Platform

हा मंद मंद वारा झुळूक सुखाची देई दोन प्रेमी जिवांन

हा मंद मंद वारा
झुळूक सुखाची देई
दोन प्रेमी जिवांना
क्षण हा प्रीतीचे देई

या सागरी किनारी
शंख शिंपल्यांची रास
हताश या जिवाला
मिळे जगण्याची नवी आस

जीवनाचे कोडे अवघड
सोडवता हे सुटेना
येता या सागरी किनारी
कोणतीही समस्या उरेना

या सागरी किनारी
मन प्रसन्न होवूनी जाई
धुंद आसमंत सारा
गीत मी मनात गाई

©Mangesh Kankonkar या सागरी किनारी🌊

#seaside
हा मंद मंद वारा
झुळूक सुखाची देई
दोन प्रेमी जिवांना
क्षण हा प्रीतीचे देई

या सागरी किनारी
शंख शिंपल्यांची रास
हताश या जिवाला
मिळे जगण्याची नवी आस

जीवनाचे कोडे अवघड
सोडवता हे सुटेना
येता या सागरी किनारी
कोणतीही समस्या उरेना

या सागरी किनारी
मन प्रसन्न होवूनी जाई
धुंद आसमंत सारा
गीत मी मनात गाई

©Mangesh Kankonkar या सागरी किनारी🌊

#seaside