आऊटलेट बांध घाला, पाणी आडवा ते... मुरेल ही... जिरेल ही... कोसळल्या की पाऊसधारा, ते भरेल ही... आणि भरावं ही! पण ध्यानात ठेवा! ते भरून उबडू नये, फुटू नये... यासाठी एक 'आऊटलेट' ठेवा, जास्तीचं वाहवता येईल, बांध शाबूत राहील, पाणी मुखात जाईल! अगदी तसंच आहे मानवी जीवन... बांध असतो घातलेला आपण, आपल्याच दुःखाला... दुःख सारे साठवतो... आठवतो... गोठवतो सुखाचा पिटतो दिंडोरा... सारेच! पण दुःखाचा निचरा व्हायला, नसतं 'आऊटलेट' ज्यांच्याकडे... ते ढासळतात... कोसळतात आणि संपवतात जीवन... फुटतो बांध! म्हणून... एक आऊटलेट ठेवा, दुःखाचा निचरा व्हायला! हसा, हसवा... जगा, जगवा, जगू द्या! जगण्याचा सोहळा होऊ द्या! जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade #NirbhayaJustice