Nojoto: Largest Storytelling Platform

Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा. #madhuki

Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा.  #madhukinikar #yqtaai #yqmarathi  
सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता शांत झाली होती. त्या शांत व मनमोहक वातावरणात सिद्धार्थला क्षणभर थांबाव वाटलं. मारुती मंदिरासमोरच्या प्रांगणात बरीच मुले खेळत होती. भिंतीला टेकून, एका कडेला सायकल उभी करत त्यानं पिशवीतील पेढ्यांचा बॉक्स हातात घेतला. मंदिराच्या पायऱ्या चढून वर आला. दोन्ही हात जोडत मारुती समोर नतमस्तक होत, त्याने दोन पेढे देवासमोर ठेवले व काही वेळ त्या तेजोमय मूर्तीकडे बघत तो तसाच बसून राहिला. पाठीमागे मुलांचा खेळ व गोंधळ चालू होता. त्याने मागे वळून त्या निरागस चेहऱ्याकडे पाहिले. त्यांना आवाज देत तो बाहेर पायर्‍याजवळ आला. त्याच्या आवाजाने खेळ बंद करून दोघेजण सिद्धार्थच्या दिशेने आले. 
"हे घ्या पेढे." 
त्यांच्या हातावर एकेक पेढा ठेवत तो म्हणाला. मुलांनी लगेच विचारलं, 
"पेढे कसं काय काका?" 
"तुमच्या या काकाला तालुक्याच्या गावी अभियंता पदावर नोकरी मिळाली आहे. त्यासाठी हे पेढे." 
हे ऐकताच पोरं जोरात ओरडली. "अरे ये... इकडे या... खेळ बंद करा आणि पेढे घ्या. आपला सिद्धार्थ काका अभियंता झालाय."
त्यांच्या हातावर पेढे ठेवताना सिद्धार्थचा आनंद ओसंडून वाहत होता. भिंतीच्या कडेला टेकून ठेवलेली सायकल बाजूला काढत त्याने परत पॅडलवर पाय मारले व घराच्या दिशेने निघाला. लाकडाचं फाटक उघडून तो आत आला. समोर ओसरीत आराम खुर्चीवर बसलेले माधवराव वृत्तपत्र वाचत होते. निर्मलाबाई व गिरिजाबाई तांदूळ निवडत होत्या. स्वातीच्या दोन्ही मुलांचा शेजारच्या मुलांशी अंगणात गोट्यांचा मस्त डाव रंगला होता. खेळता खेळता त्यांच्या पैकी एकाची नजर सिद्धार्थवर जाताच, तो पटकन जागेवरून उठला व लागलीच त्याने इतरांना सतर्क केले. सिद्धार्थला पाहताच गोट्यांचा डाव मध्येच सोडून ते धावत न्हाणीघराकडे गेले. हात पाय धुऊन देव्हाऱ्यासमोर आले. एकाने दिव्यात तेल ओतले दुसऱ्याने काडेपेटीच्या मदतीने दिवा पेटवला. मांडी घालून व हात जोडून ते देव्हाऱ्यासमोर बसले व शुभम करोति कल्याणमचा पाढा सुरू झाला.