Nojoto: Largest Storytelling Platform

White का पाहिजे असा एक दिवस प्रेम करण्यासाठी एवढे

White का पाहिजे असा एक दिवस प्रेम करण्यासाठी 
एवढे व्यस्थ झालो का आपण व्यक्त होण्यासाठी 
जे आहे ते सांगायची गरज भासते कशाला 
आपण उरलो नाही का एकमेकांनसाठी 
प्रेम केलं की वाढतच जातं रक्ताचं नाही पण हक्काचं नातं 
तू आहेस माझ्या साठी एवढं पुरेसं आहे 
तू सोबत असावं हा हट्ट कशासाठी 
मला माहीत आहे तुझ्या मनातलं तस कळत असेल ना तुला
एका उचकीने आठवणींचा उठत असेल वणवा 
दुरावा म्हणून का हताश व्हायचं मग 
तुझ्या असण्याचा पुरावा खूप आहे जगण्यासाठी
आपल्यावर कोण प्रेम करत त्यांना जीव लावावा 
देवा बरोबर एक नमस्कार त्यांनाही करावा 
आई बाबा मुलं भावंड अगदी मित्र सुद्धा 
प्रेम कोणीही करू शकत 
प्रियकर वा प्रेयसी ची गरज नसते जीव लावण्यासाठी

©Jayesh Sawant #love_shayari 
#मराठीप्रेम