Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणी तुझ्या सतत अवतीभवती वावरतात सोबत जगलेले क्षण

आठवणी तुझ्या सतत
अवतीभवती वावरतात
सोबत जगलेले क्षण
फिरूनी बरसतात...

तुझ्याविना वेदनेचे
आभाळ मनी दाटते
कसे रिक्त करू भाव
तुझेच रुप भासते...

जपल्या आहेत भावना
जपलेत तुझे बोल
जपेन आयुष्यभर
तुझे माझे प्रेम...

एक तूच ध्यास
तूच माझा श्वास
तुझेच जीवा वेड
मनी तुझीच आस...
                         अंजु...!!

©Sujata Chavan #तुझीच आठवण#
आठवणी तुझ्या सतत
अवतीभवती वावरतात
सोबत जगलेले क्षण
फिरूनी बरसतात...

तुझ्याविना वेदनेचे
आभाळ मनी दाटते
कसे रिक्त करू भाव
तुझेच रुप भासते...

जपल्या आहेत भावना
जपलेत तुझे बोल
जपेन आयुष्यभर
तुझे माझे प्रेम...

एक तूच ध्यास
तूच माझा श्वास
तुझेच जीवा वेड
मनी तुझीच आस...
                         अंजु...!!

©Sujata Chavan #तुझीच आठवण#