Nojoto: Largest Storytelling Platform

मनाच्याच त्या वळणवाटा किती दूर गेल्या कसे सावरावे

मनाच्याच त्या वळणवाटा किती दूर गेल्या
कसे सावरावे अन् आवरावे किती या मनाला आता
कितीदा रडावे कितीदा हसावे
किती खोल जावे कुणाच्या अस्तित्वाला
शोधताना आता......

तुझे गीत ओठावरी आज यावे
तुझी बासरी मीच व्हावे जरा आता
तुझे सूर माझ्यात मिसळून जावे
ऋतू पाझरावे मनाचे जरा आता
 उगा आस लावून जातसे मला तू 
किती त्रास देते मला तु सखे गं
वळूनी पहातो कधी टाळतो मी आता......

अन् जिवाला सदा इथं जाळतो फारसा मी आता
कधी दार वाजे अनाहुत तुझा भास होई पुन्हा पुन्हा
मेघ गरजेल पुन्हा नव्यानं तुझिया प्रेमातला
तुला भेटताना मिठी घट्ट होई ती आता
जुनाच पण जरासा नवा स्पर्श तो रेशीम स्वप्नातला आता......

तुझ्या  सोबतीने नभापार जावे पुन्हा मी
क्षणाला सुखावे निळे चांदणे पुन्हा मी
पुन्हा धुंद व्हावे तुझ्या त्या मिठीतच मी आता
पुन्हा आठवावे तुझे छेडणे प्रेमतराणे मी आता......

©शब्दवेडा किशोर #मनातील_भावना