Nojoto: Largest Storytelling Platform

गावापासून दूर हल्ली मी गावापासून दूर राहतो कधीतर

गावापासून दूर 
हल्ली मी गावापासून दूर राहतो 
कधीतरी प्रसंगानेच गावाकडे जातो 
रानभरी झालेली पाखरं घरट्याकडे परतल्यावर 
गदगदणाऱ्या झाडासारखी आईची अवस्था होते 
ते बघून मी उन्मळून जातो ..पार मुळातून 
पण काही क्षणापुरताच !
जुन्या आठवणींची जत्रा भरते मनांत ..
जुन्या दिवसांना माझ्यासारखंच पाठीवर घेवून 
बापू पुन्हा ..सारी जत्रा फिरवून आणतात ..
जिन जिव्हाळा ..नाती गोती ..रुसनं जपनं ..
सारं कांही भेटत ...या जत्रेत ......
या जत्रेत ..मी माझं ...' मी पण ' विसरून जातो 
एक दोन दिवसांचा मुक्काम संपतो....
कर्तव्याच्या पाठी लागून मी परदेशी झालेला असतो 
मनातली पालं उठतात ...जत्रा संपते.....
अस्वस्थं मनानं मी परतीला लागतो ..
मी गावापासुन दूर दूर जातो ....
पण .....गदगदनारं झाड आठवून 
रानभरी पाखरांसारखा बेभान होतो ...
मी गावापासून दूर राहतो .....
मी गावापासून दूर राहतो......
***
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive Gavapasun dur
गावापासून दूर 
हल्ली मी गावापासून दूर राहतो 
कधीतरी प्रसंगानेच गावाकडे जातो 
रानभरी झालेली पाखरं घरट्याकडे परतल्यावर 
गदगदणाऱ्या झाडासारखी आईची अवस्था होते 
ते बघून मी उन्मळून जातो ..पार मुळातून 
पण काही क्षणापुरताच !
जुन्या आठवणींची जत्रा भरते मनांत ..
जुन्या दिवसांना माझ्यासारखंच पाठीवर घेवून 
बापू पुन्हा ..सारी जत्रा फिरवून आणतात ..
जिन जिव्हाळा ..नाती गोती ..रुसनं जपनं ..
सारं कांही भेटत ...या जत्रेत ......
या जत्रेत ..मी माझं ...' मी पण ' विसरून जातो 
एक दोन दिवसांचा मुक्काम संपतो....
कर्तव्याच्या पाठी लागून मी परदेशी झालेला असतो 
मनातली पालं उठतात ...जत्रा संपते.....
अस्वस्थं मनानं मी परतीला लागतो ..
मी गावापासुन दूर दूर जातो ....
पण .....गदगदनारं झाड आठवून 
रानभरी पाखरांसारखा बेभान होतो ...
मी गावापासून दूर राहतो .....
मी गावापासून दूर राहतो......
***
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive Gavapasun dur