Nojoto: Largest Storytelling Platform

सोनेरी पहाट सोनेरी ही पहाट झाली घेऊन आनंदाने राष्

सोनेरी पहाट
सोनेरी ही पहाट झाली घेऊन आनंदाने 
राष्ट्राच्या या रक्षणासाठी शिवबा हे जन्मले
आनंद ओसोडून वाहे हर एक मानवा
रांगोळी ही सजली ओटी ,तोरण बांधले
भगव्या झेंडयाने हे किल्ले ही सजले....
पहाट झाली विचाराची ,स्वाभिमानाची
रक्षणार्थ जो धावून येतो मर्द तो मराठयांचा
भक्त तो जगदंबेचा ,पुत्र तो जिजाऊ चा
राखतो मान सन्मान या महाराष्ट्र मातीचा....
विचार नेहमी जनतेचा ,विचार हा गीतेचा
किती ही वर्ष सरली ,तरी तेच रक्त सळसळते
शिवबाच्या पराक्रमाचे गुणगाण गात राहते
पहाट ही वर्षातील एक दिवसाची तरी क्षण लाख मोलाचा
हीच पहाट रोज होउदे हर एक मानवा
शिवबाचे तेज झळकत राहो काळयुगी मानवा
नाही द्वेष ,राग ,ठेवू मणी ,स्वाभिमान ही बाळगू
शिवबाच्या या राष्ट्राला पुन्हा पावन बनवू 
( कवी - संदीप पवार ) सोनेरी पहाट