White मनातले सारे मनात उरले, शब्द ओठांवर आले नाही. मुखवटे रचले चेहऱ्यावर किती, आरशात दिसणारा उरला नाही. रीती-रिवाजांचे बंधन कठोर झाले, मोकळ्या हवेतही श्वास राहीला नाही. जीवनाच्या वाटेवर चालताना, स्वप्नांच्या छायेला धरणे झाले नाही. मन जपले तरी जखमांच्या धाग्यांनी, पुन्हा स्वतःला सांधणे झाले नाही उगाच कशाला दुःखाचा पसारा, कधी कुणाच्या मनासारखे झाले नाही सौ सुधा सुधीर बेटगेरी बागलकोट ©Sudha Betageri #sudha